पान 1
मिठू पोपट अर्जुनसोबत राहतो. तो हिरवा आहे आणि त्याची चोच लाल आहे.
पान 2
मिठू सगळ्यांची नक्कल करतो. बाबांना शिंक येते. “आ-छी!” मिठू म्हणतो.
पान 3
कुकरची शिट्टी वाजते. “शूऽऽ!” मिठू म्हणतो. आई स्वयंपाकघरात धावते. कुकर तर शांत आहे!
पान 4
दारावरची बेल वाजते. “टिंग-टाँग!” मिठू म्हणतो. दारात कुणीच नाही.
पान 5
अर्जुन मिठूला दोन नवे शब्द शिकवतो: “थँक यू.”
पान 6
आता मिठू सगळ्यांना “थँक यू!” म्हणतो, पंख्यालासुद्धा. घरचे सगळे हसतात.