पान 1
खूप वर्षांपूर्वी अर्जुन राजासाठी एक नवा खेळ बनवतो. त्याच्या पटावर 64 घरे आहेत.
पान 2
राजाला खेळ खूप आवडतो. “काहीही बक्षीस माग!” राजा म्हणतो.
पान 3
अर्जुन म्हणतो, “पहिल्या घरात तांदळाचा एक दाणा. पुढच्या घरात दोन. मग चार, मग आठ.”
पान 4
राजा हसतो. “फक्त तांदूळ? आणा रे!”
पान 5
पण तांदूळ दुप्पट, मग पुन्हा दुप्पट होत जातो. लवकरच सगळ्या राज्यातसुद्धा पुरेसा तांदूळ उरत नाही!
पान 6
राजा अर्जुनला नमस्कार करतो. “तू खूप हुशार आहेस. चल, आता आपण नुसता खेळच खेळूया!”